पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दि. 11/09/2022 रोजी सांयकाळच्या सुमारास बातमीदारा मार्फत पोलीसांना बातमी मिळाली की, नवनाथ शत्रुघ्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला याने त्याचे मौजे तिसंगी ता. पंढरपूर गावचे शिवारातील पंढरपूर ते कराड रोडवरील अजिंक्यतारा हॉटेल मध्ये व हॉटेलचे पाठीमागे असलेल्या शेवाळे यांचे घरातील खोलीमध्ये अवैद्य देशी विदेशी दारुचा साठा केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दोन पंचासमक्ष पोलीसांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील नमुद वर्णनाच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या आहेत.
किंगफिशर बिअर किंगफिशर बिअर टुबर्ग बिअर देशी दारु संत्रा अ.न दारुचे नाव मिली बाटली संख्या प्रत्येकी किमंत एकुण किंमत 1 650 2 330 3 650 4 180 5 180 6 180 7 180 8 180 9 180 10 180 11 180 12 180 13 ऑफिसर चॉईस व्हीस्की 180 14 डॉ. श्रीपुर ब्रॉन्डी व्हीस्की 180 | इंपिरीअल ब्यु मँकडॉल नंबर 1 व्हीस्की 19240 6490 12580 17360 29700 41600 5535 9350 5025 5600 18000 5700 5070 2530 एकुण 1,83,780 मँकडॉल नंबर 1 रम व्हाईटमिस्चिफ वोडका ब्लेडर प्राईड व्हीस्की ब्लँक डिलक्स. व्हीस्की रँयल स्टॅग व्हीक्सी रोमानो वोडका 104 59 68 248 198 260 41 55 15 40 100 38 39 23 185 110 185 70 150 160 135 170 335 140 180 150 130 110
येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा माल मिळुन आल्याने पोनि श्री धनंजय अ. जाधव यांनी पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला. आरोपी बंडु भारत पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला यास ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलचे मालक नवनाथ शत्रुग्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला जि. सोलापूर याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही.
तरी यातील आरोपी नामे 1 ) नवनाथ शत्रुग्न पाटील (हॉटेल मालक) व 2 ) बंडु भारत पाटील वय 32 वर्षे (मॅनेजर) दोघे रा. गायगव्हाण ता. सांगोला जि. सोलापूर यांनी बेकायदा बिगरपास परमिटने किं.रु. 1,83,780/-रुच्या वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले म्हणुन त्याचे विरुध्द पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 415/2022 महाराष्ट्र दारुबंदी अधिनयम 1949 चे कलम 65 (ई), 68 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर विभाग पंढऱपुर, याचे मार्गदर्शना खाली पोनि धनंजय जाधव, पोसई तुळशिराम शिंदे, सपोफौ तैबुद्दीन मुंडे, आप्पासाहेब कर्चे, शहाजी मोटे, संतोष जगताप, पोहेकॉ सुभाष शेंडगे, पोहेकॉ सुनिल जाधव, पोना अमर सुरवसे, पोना रविंद्र बाबर, पोना गणेश इंगोले, पोना जावेद पठाण, पोकॉ रशिद मुलाणी, मपोहेकॉ मोनिका वाघे, मपोकॉ दिपाली इंगोले, चापोना राहुल शिंदे यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोसई दिलीप शिंदे करीत आहेत.
अवैद्य दारु विक्रेत्यांना कठोर कारवाईचा ईशारा पोलीस निरीक्षक धनजंय जाधव पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी दिला आहे.