पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मौजे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांच्या वतीने ग्रामपंचायतीतील सर्व महिला कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांतील महिला कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर येथे मोफत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा अभ्यास दौरा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
महिला कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रांतील विकासकामे, प्रशासकीय कार्यपद्धती आणि सामाजिक उपक्रमांची माहिती मिळावी, तसेच त्यांच्या ज्ञानात व अनुभवात भर पडावी, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश होता.
महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानात भर घालणारा हा उपक्रम लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

