अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
प्रसिद्ध सिनेकलावंत, लेखक-दिग्दर्शक 'देऊळ बंद' फेम प्रवीण तरडे यांनी आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रवीण तरडे म्हणाले की मी अनेक चित्रपट केले, देऊळ बंद सारखा विषय केला, पण अक्कलकोटला आलं की खऱ्या अर्थाने देव काय असतो हे समजतं. इथं कुठलाही बडेजाव नाही, फक्त स्वामी आहेत आणि त्यांची सेवा आहे. मला विशेष करून महेश मालक इंगळे यांचे कौतुक करायचंय. ते स्वतःला चेअरमन समजत नाहीत, तर स्वामींचा सेवेकरी समजतात. मंदिरातली शिस्त, स्वच्छता, आणि भाविकांना दिला जाणारा मान-सन्मान हे सगळं पाहून असं वाटतं की मंदिर खऱ्या अर्थाने एका भक्ताच्या हातात आहे. मी इथून ऊर्जा घेऊन जातोय, पुढच्या चित्रपटासाठी नक्कीच स्वामींचा आशीर्वाद कामाला येईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा कानमंत्र घेऊन मी परत जातोय.
श्री स्वामी समर्थ असे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी नवनाथ बनकर, चिन्मय फुले, प्रथमेश मालक इंगळे, श्रीकांत मलवे उपस्थित होते.

