कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी थेट संवाद साधला.
या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी जाणून घेतल्या तसेच सुंसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक सुजय देसाई व कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व समस्या जाणून घेतल्या व यावर सविस्तर चर्चा केली. चर्चेतून डॉ. रोंगे सरांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) चे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे हे पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी संवाद साधत आहेत. या संवादाच्या माध्यमातून ते शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
याच अनुषंगाने डॉ. रोंगे सर यांनी करवीर तालुक्यातील कोरगांवकर हायस्कूल, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइन, छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ लॉ, केआयटी कॉलेज, सुंसंस्कार हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूल, सौ. एस. एम. लोहिया कॉलेज आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेज या शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. याशिवाय सिये हायस्कूल, भैरवनाथ हायस्कूल, भुयेवाडी, जिनियस पब्लिक स्कूल भुयेवाडी, देवी पार्वती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडगणे, केरली हायस्कूल केरली, ज्योतिर्लिंग विद्यालय, वडणगे, ग. गो. जाधव विद्यालय केरली, हनुमंत विद्यालय केरली आणि एस. के. पाटील महाविद्यालय, प्रयाग चिखली या शैक्षणिक संस्थांनाही भेटी देऊन तेथील शिक्षकांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान सुंसंस्कार हायस्कूल, कोल्हापूरचे मुख्याध्यापक सुजय देसाई यांच्या निवासस्थानी डॉ. रोंगे सर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. रोंगे सर यांच्या हस्ते सुजय देसाई यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्याशी शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे कोरगांवकर हायस्कूल, कोल्हापूरचे मुख्याध्यापक श्री. संजय सौंदलगे यांच्या निवासस्थानीही डॉ. रोंगे सर यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षकांच्या समस्या व शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, टीईटी, जुनी पेन्शन योजना, पदोन्नती, नियुक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या अभ्यासपूर्ण पद्धतीने शासन स्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. रोंगे सर यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून डॉ. रोंगे सर यांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे शिक्षकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने त्यांनी करवीर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करून ते शासन स्तरावर मांडण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

