कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोल्हापूर येथे ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडले.रविवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी के.एस.आय.पब्लीकेशन व्दारा भारत मंदिर सभागृह, महात्मा गांधी मैदान जवळ कोल्हापूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात, कथा कथन,कवि संमेलन, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या महात्मा गांधी साहित्य भूषण पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अशा विविध कार्यक्रमांनी साहित्य संमेलन संपन्न झाले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार होऊन कवी इंगळी सरकार विलास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात साहित्य संमेलनाला आलेल्या साहित्यिकांना काही सूचना दिल्या.या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब देशमुख यांनी केले,तर
विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते काही पुस्तकांचे, प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.स्वागताध्यक्ष दशरथ धायगुडे यांनी कोल्हापूर शहराची आध्यात्मिक माहिती सांगून एक गोंधळ गीत गायले, कथा कथनच्या कार्यक्रमात बाळासाहेब देशमुख यांनी मंतरलेला वाडा ही लक्षवेधी कथा कथन केली, या वेळी प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी यांनी सांगितले की, साहित्यिकांना लिहीण्यासाठी दैवी शक्ती लाभलेली असते.तर संमेलन अध्यक्ष दत्तात्रय वारकड यांनी सांगितले की," विचार माणसाला घडतोही आणि बिघडवितो ही.साहित्यिकांनी कॅप्टन ची भूमिका पार पाडून युवकांना मार्गदर्शन करावे, साहित्यिकांच्या विचारांचा आविष्काराने समाज घडतो, शोध विचारांच्या माध्यमातून होतो, कवी सतत जागृत असतो, लेखणीत मोठी ताकद असते, साहित्य समाजाला दिशा देण्याचे काम करते,ए.आय., डिजिटल युगात ही साहित्यिक प्रगतीपथावर आहेत,सिने निर्माते दिग्दर्शक काशिनाथ आहेर यांनी ही या वेळी मार्गदर्शन केले, स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली, या मध्ये अनेक कवी कवयित्रीनी शेतकरी, दुष्काळ, नाते संबंध, प्रेम, विनोदी, गंभीर अशा विविध विषयांवरील व विविध आशयाच्या कविता सादर केल्या.कवी भारत कवितके मला काय माहीत? ही सतत तारुण्यात वावरणारी, काहीसी विनोदी तर काहीसी गंभीर स्वरूपाची,जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वीची वास्तव वादी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली, कवी संमेलनच्या अध्यक्षा मेघा ऊळागड्डे, होत्या.
या वेळी मनिषा कांबळे, भाऊसाहेब कांबळे, सुरेखा वाडकर, मनिषा वराळे, माधुरी पंडित, ज्ञानेश्वर धायरीकर,कामत सर व इतर कवी कवयित्रीनी कविता सादर केल्या.तर या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अतिशय मार्मिक पणे, सर्व कविता चे योग्य विश्लेषण करीत करीत केले.त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी साहित्य भूषण पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.
आमचे मुंबई प्रतिनिधी पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास महात्मा गांधी साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

