भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
आळंदी येथे धनगर सेवा संघाची विशेष सर्व साधारण बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सोमवार दिनांक १२ आक्टोंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या सर्व साधारण बैठकीत धनगर समाजातील अनेक मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपापली मते मांडली,संघाचा या बैठकीत प्रामाणिकपणा दिसून येतो, धनगर समाज बांधवांनी वैयक्तिक आपले मत विचार पत्राद्वारे कळवावे, लोकशाही मार्गाने संविधानाचा आधार घेऊन एकत्र यावे, घटना समितीने वाद विवाद सोडवावे, अध्यक्ष व सचिव पदावर तरुणांना संधी द्यावी,सूज्ञ, चांगल्या गुणांच्या समाज बांधवांना संधी द्यावी, कमिटी ची मुदत तीन वर्षे ऐवजी पाच वर्षे ठेवावी, सल्लागार कडून वाद विवाद सोडवावे, समाजासाठी वेळ देणारी कमिटी असावी , तरुणांनी पुढे यावे, या धर्म शाळेसाठी राजकीय व्यक्ती कडून आर्थिक मदत मिळवून घ्यावी,वाद विवाद असल्याने आर्थिक निधी मिळणे अवघड झाले आहे, जयवंतराव कवितके यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कमिटीचे कार्य कौतुकास्पद आहे, प्रशासकीय सेवेत असलेल्या बांधवांना संधी द्यावी, घटना बध्द कार्य करावे न केल्यास समाजाने कडाडून विरोध करावा, कमिटी मध्ये कष्टकरी, सांप्रदायिक लोकांंचा समावेश असावा, अशा प्रकारे अशा प्रकारे विचार व्यक्त केले गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव भांड यांनी सांगितले की ", संस्था ही धार्मिक असल्याने कमिटी मध्ये धार्मिक समाज बांधव असायला हवे, अहंकार नसावा, नैतिकतेवर आधारित आदर्श घटना असावी,६० दिवसांच्या आत घटना तयार करुन धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता घेण्यात यावी."
यावेळी अंकुशराव भांड,राम मांडुरके, रामभाऊ लेंडे, रामभाऊ जोरी,मूकुंदराव कुचेकर, मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके, संस्था चे अध्यक्ष जयवंतराव कवितके, नगरसेवक रमेश लेंडे,महादेव कवितके,काळूराम कवितके, गोविंदराव कवितके,अड.ज्योती भोंडवे अरविंद गावडे व इतर पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन दत्तात्रय भोजणे यांनी केले.

