भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद सदस्य सुनील गायकवाड व पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा, स्वच्छता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच रुग्णांना कोणत्या अडचणी येत आहेत, याबाबतही संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.
आरोग्य केंद्रातील विविध बाबींसंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्यात आली. आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या बाबींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे, तुकाराम ढोबळे, किशोर खरडकर, ज्योतीराम देठे, नवनाथ गायकवाड, दत्ता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

