पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या स्वतंत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी त्याबाबतचा शासन आदेश काढावा कामगार विभागामार्फत राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करण्यात यावी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे अशी मागणी करण्यात आली.
या कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सभासद असणाऱ्या वृत्तपत्रे विक्रेत्यांच्यासाठी पुढील योजना राबविण्यात याव्यात
वृध्द झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना निवृत्ती वेतन लागु करावे, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्याकरीता राखीव कोटा ठेवावा, वृत्तपत्र विक्रेत्याला 75 टक्के किंवा अधिक कायमचे अपंगत्व आल्यास साहाय्य, मयत झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्याचे वारसास अंत्यविधीसाठी आर्थिक साहाय्य, वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री वृत्तपत्र विक्रेत्यास विधुर पतीस आर्थिक साहाय्य, वृत्तपत्र विक्रेत्याचा वृत्तपत्र वाटपाचे कामावर असतांना मृत्यु झाल्यास वारसास आर्थिक साहाय्य मिळावे, वृत्तपत्र विक्रेत्याच्या गंभीर आजाराच्या उपचारार्थ अर्थ साहाय्य, मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॉल करिता जागा आरक्षीत करुन द्यावी व अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात गृहीत धरु नये. रस्ते रुंदीकरण व विकासाचे योजनेअंतर्गत स्टॉल हलविण्यापुर्वी वृत्तपत्र विक्री व्यवसायाकरीता साईची पर्यायी जागा द्यावी, वृत्तपत्र विक्रेत्याचे पत्नीस / स्त्री विक्रेत्यास प्रसूतीसाठी मदत, वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलांच्या शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आदी मागण्यांसाठी आंदोलन आहे.
9 ऑक्टोंबर 2026 रोजी निघणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी व मोर्च्याच्या नियोजनासाठी दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर बिंदू चौक येथे बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीस जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजानिस तसेच बहुसंख्य विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाच्या विविध विषयावर चर्चा झाली

