सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत.
हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पत्रकार संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास पुण्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला...
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी ही करण्यात आली.
या वेळी सोलापुरातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

