सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या, त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.
सोलापुर उपविभागात पेट्रोलींग करीत असताना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोहोळ पोलीस ठाणे कडील दरोडा गुन्हयातील पाहिजे आरोपी संशयीतरीत्या सोलापूर ते पुणे महामार्गा वरील मोहोळ येथील वैराग कडे जाणा-या ब्रिज खाली फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी गेले असता, बातमीप्रमाणे एक इसम संशयीत रित्या फिरताना मिळुन आल्याने सदर इसमास तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून नमुद इसमाकडे नाव गाव व पत्ता विचारले असता, त्याने त्यांचे नावे सचिन उर्फ सख्या अभिमान गर्छ अभिमन्यु काळे, वय ३२ वर्षे रा. एकता नगर सापगऊह गल्ली जत . ता. जत जि . सांगली सध्या रा. यल्लमवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले, नमुद आरोपीस विश्वासात घेवून अधिक विचारपुरस करता त्याने त्याचा साथीदार बाबा छप-या काळे रा. यलम्मावाडी ता. मोहोळ याच्यासह खालील गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.
अटक आरोपी याचे गुन्हे अभिलेख तपासले असता आरोपी नामें सचिन अभिमन्यु उर्फ अभिमान काळे हा खालील नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्रासह तेलंगना राज्यामध्ये पाहिजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय राठोड, पोलीस हवालदार सलिम बागवान, हरीदास पांढरे, विरेश कलशेट्टी, नागेश कोंदणे, व्येकटेश मोरे,जगदीश राठोड, पोकों दिनेश पवार, योगेश जाधव, कपिल काटकर, सुनिल पवार, अशोक हलसंगी, मुपो पल्लवी इंगळे-पाटील, सुनंदा झळके तसेच मोहोळ पोलीस ठाणे कडील पोहेकों गणेश नाळे यांनी बजावली आहे.

