पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
साखरेच्या दराबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि यंदा एल निनोच्या प्रभावामुळे देशातील साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुष्काळामुळे ऊस लागवडीत तब्बल 70 टक्क्यांची घट झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यात उपलब्ध ऊसापैकी काही प्रमाणात ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवला जात असल्याने साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे देशात साखरेची टंचाई निर्माण होण्याची आणि आगामी गाळप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.त्यामुळे साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात?

