सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 01 ऑक्टोबर, 2026 रोजी १. फणसे महाराज मठ, इसबावी, पंढरपूर २. पेन्शन संघटना मंगल कार्यालय, वसुद रोड सांगोला ३. सावता माळी मंगल कार्यालय, पंढरपूर रोड, माळशिरस येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. जेष्ठांना २०२६/प्र.क्र.१५३/ज्येनाक दि.२४/०९/२०२६ च्या परिपत्रकान्वये दिनांक ०१ ऑक्टोंबर, २०२३ हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करणेबाबत सूचना प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुषंगाने १. फणसे महाराज मठ, इसबावी, पंढरपूर २. पेन्शन संघटना मंगल कार्यालय, वसुद रोड सांगोला ३. सावता माळी मंगल कार्यालय, पंढरपूर रोड, माळशिरस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये आवाहन केल्यानुसार मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विभागाच्या योजनांबात माहिती देण्यात आली. जेष्ठांसाठी असलेल्या कायदेविषयक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन विधी व न्याय विभागाने केले. पोलीस विभागाकडून त्यांच्या विभागाकडून जेष्ठांसाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली.
तदनंतर ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यामध्ये विविध जेष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी व जेष्ठ नागरिकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यावरती संबंधित विभाग व शासनास पाठपुरावा करणार असल्याबाबत प्रतिनिधी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयाकडून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर व महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी विधी व न्याय विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

.jpeg)