भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
कांदिवली पश्चिम येथील माॅं दुर्गा भवानी मित्र मंडळाचा नवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश वर्मा यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे.
मंडळात वाजत गाजत देवीच्या मूर्तीचे उत्साहात आगमन झाले आहे, पूजा पाठ व आरती करून देवी मंडपात बसविण्यात आले आहे, सालाबादप्रमाणे यंदाही या नवरात्र उत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत,रोज गरबा दांडिया रास होणार आहे,
मान्यवरांचे स्वागत व सत्कार,या मंडळाचे अध्यक्ष सुरेश वर्मा, उपाध्यक्ष प्रदीप गुप्ता, सचिव लालू शुक्ला, उपसचिव विजय कुशवाहा, खजिनदार तुषार राजभर,उपखजिनदार करण वर्मा ,आदी पदाधिकारी उपस्थित असतात,तर आशिष वर्मा, दुर्गेश विश्वकर्मा, संदिप जैसवाल, विवेक गुप्ता ,सुरज कुशवाहा, संतोष मिश्रा,भरत नागरे, सुनील गुप्ता,अमर निषाद, दिलीप विश्वकर्मा, प्रविण पाल, पिंटू वर्मा, मुकेश गुप्ता,आदी कार्यकर्ते या प्रसंगी विशेष परिश्रम घेत आहेत.

