मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते मराठी कलाकार रेवती लेले यांचा सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दर्शन व्यवस्था ही अत्यंत शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सोयीची आहे. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीने स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष दिले आहे. येथील वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते, म्हणून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे व्यवस्थापन अतिषय सुंदर असल्याचे मनोगत छोट्या पडद्यावरील मराठी कलाकार रेवती लेले यांनी व्यक्त केले.
नुकतेच मराठी कलाकार रेवती लेले यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी कलाकार रेवती लेले व त्यांच्या समवेत असलेले कौशिक भिडे, धनंजय भिडे, पौर्णिमा भिडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी वटवृक्ष मंदीरातील दर्शन व्यवस्थापन बद्दल मनोगत व्यक्त करताना मराठी कलाकार रेवती लेले यांनी वरील भावोद्गार काढले.
पुढे बोलताना मराठी कलाकार रेवती लेले म्हणाल्या की श्री स्वामी समर्थांची आपल्यावर विशेष कृपादृष्टी आहे. स्वामी भक्त या नात्याने नियमित स्वामींचे स्मरण करून आपल्या कामाला सुरुवात करीत असल्याने माझी भूमिका असलेल्या कलर्स मराठी वाहिनी वरील स्वामीनी, स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी, कोण होतीस तू काय झालीस तू, तुही रे माझा मितवा या मराठी मालिकांना प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. याचे सर्व श्रेय मी माझ्या स्वामींना देते असे सांगून यापुढील कार्यातही स्वामी नेहमीच साथ देतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, संजय पवार, विपुल जाधव, रमेश शिंदे सर, श्रीकांत मलवे, चेतन जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

