मुंबई येथील राजीव रंजन व नीता रंजन यांची सुमारे २८ लाख रुपयांची सुवर्णभेट; मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी मुंबई येथील राजीव रंजन व नीता रंजन यांनी भक्तिभावाने सोन्याचे दोन तुळशी हार अर्पण केले आहेत. या दोन्ही तुळशी हारांचे एकत्रित वजन १६६ ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत 22 लाख रुपये आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेप्रती असलेली अपार श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही सुवर्णभेट अर्पण केली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या सेवेसाठी भाविकांकडून विविध स्वरूपात देणग्या अर्पण केल्या जातात. या देणग्यांमधून भाविकांची श्रींच्या चरणी असलेली निष्ठा, श्रद्धा आणि समर्पणभाव व्यक्त होत असतो. रंजन दाम्पत्याने अर्पण केलेले सोन्याचे तुळशी हार हे त्याच भक्तिपरंपरेचे प्रतीक आहे.
या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांनी देणगीदार राजीव रंजन व नीता रंजन यांचा यथोचित सत्कार केला.

