अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी फ्लोअर स्वीपर मशीन अर्पण करण्यात आली आहे. मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने मंदिर परिसर, मोकळे पटांगण, हॉल स्वच्छ ठेवणे हे मोठे आव्हान असते. पारंपारिक झाडूने झाडताना मोठ्या प्रमाणात धूळ उडते ज्यामुळे भाविकांना त्रास होतो.
यावर उपाय म्हणून नाना काटे यांनी दिलेली ही फ्लोअर स्वीपर मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनमुळे धूळ न उडता परिसर जलद, सहज आणि कमी वेळात स्वच्छ होणार आहे. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ही एक पुण्यकारक आणि अत्यंत उपयुक्त भेट ठरली आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने नाना काटे यांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करण्यात आले असून त्यांचे आभार मानण्यात आले.
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले की नाना काटे यांनी दिलेली ही मशीन स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोठी मदत ठरणार असून यामुळे मंदीर परिसर जलद रित्या स्वच्छ करणेकामी सहकार्य होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रथमेश इंगळे, आशिष हुंबे, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, राम लोणारी, बालाजी सोमवंशी, संतोष जमगे, अनंत क्षीरसागर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

