भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
प्रकल्प पंढरपूर-१, बिट भाळवणी अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी नवचेतना, आधारशीला तसेच पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन येथील अंगणवाडीत करण्यात आले होते . या कार्यक्रमास ० ते ३ वर्षे व ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बालकांनी व मातांनी ‘वेलकम मेळाव्या’चा आनंद घेतला. तसेच अनौपचारिक शिक्षणाबाबत मातांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. बालकांनीही विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी गौरी नितीन कापसे हिने जलतरण स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल, तसेच संध्या शिवाजी लोखंडे हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पोषण माह निमित्त विविध पौष्टिक पदार्थांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमास अविंदा गायकवाड, स्नेहा बोधे व नंदाबाई इंगोले या माता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बचत गट सीटीएसच्या श्रीमती वाघमारे यांचीही उपस्थिती लाभली.
यावेळी ICDS पंढरपूरचे विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार यांनी मार्गदर्शन केले. तसेच ICDS पर्यवेक्षिका सोनार यांनी बालकांचा मोबाईल वापर व स्क्रीन टाइम कमी करण्याबाबत मातांना मार्गदर्शन केले.
भाळवणी बिटमधील सर्व सेविका व मदतनीस यांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

