निमगाव मगर प्रतिनिधी रामचंद्र मगर तेज न्यूज
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदापुरी चे सरपंच जयवंत सुळ होते.
यावेळी बोञे पाटील म्हणाले की मी एका शेतकरी कुटुंबातील असुन शेतकऱ्यांना काय अङचणीचा समाना करावा लागतो याची जाणीव मला असुन ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार कर्मचारीवर्ग यांचे हित जोपणारा परिवार असुन गेल्या सहा वर्षीपासून ऊस कारखानदरीत असुन आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला असुन वाहतूकदारांच्या समस्या सोङविल्या आहेत.
कर्मचारीवर्गाला 20 टक्के पगारवाढ दिली आहे 2026 व 2027 गळीत हंगामाच्या ऊसास निश्चितपणे सर्वात जास्त दर देण्यासाठी कटिबद्ध असुन आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर व 100 रूपये बील अदा केले जाईल.
ओंकार परिवार प्रतिदिन 2 लाख 5 हजार टनाचे गाळप 23 लाख लिटर इथेनॉल 228 मॅगवेट वीज निर्माण करून देशातील सर्वात मोठा साखर उद्योग आहे त्याबरोबर मेडीकल काॅलेजच्या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार घालावा असे बाबुराव बोञे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील प्रा. शारदाताई बोञे पाटील, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे,तेजस्विनी बर्गे तरंगफळचे माजी सरपंच रावसाहेब तरंगे,नारायण करचे सर्जेराव पवार, भगवान सुळ, संजय वाघमोङे यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होता.आभार रामभाऊ मगर यांनी मानले.

