पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) या योजनेअंतर्गत अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.यावर्षी पंढरपूर शाखेच्या वतीने,लोकमान्य विद्यालयातील 27 गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी पंढरपूर शाखेचे प्रबंधक धवलराज इनामदार यांनी सर्वांचे स्वागत केले व स्टेट बँक ऑफ इंडिया सीएसआर च्या माध्यमातून आयोजित करत असलेल्या सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांची सर्वांना माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करत असते, त्याचा सर्व विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले, त्यासाठी बँकेची तत्पर सेवा व सहकार्य मिळेल आश्वासन दिले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर आनंदकुमार पाटकर तसेच मुख्य प्रबंधक अनिकेत शिवदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरीष्ठ अधिकारी प्रेमप्रकाश, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय आराध्ये,प्रसिद्ध बागायतदार चंदुकाका देशमुख यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी,शिक्षक, शिक्षिका,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल विद्यार्थी व पालकांच्या वतीने दीपक इरकल यांनी बँकेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

