संग्रामनगर प्रतिनिधी संजय लोहेकर तेज न्यूज
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने सामाजीक उपक्रम राबवण्यात आला.यावर्षी गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी (ता.माढा) येथील निराधार गरजू ४५ वृद्धांना गरजेच्या वस्तूंच्या किटचे वाटप हाजन बशिरा गणीभाई तांबोळी,हाजन झुबेदा हाजी अब्बास तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ महाराज देशमुख,ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी त्यांचे सहकारी व वृद्धाश्रमातील वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी वृद्धाश्रमाच्यावतीने भाग्यश्री राऊत यांनी मनोगतामध्ये वृद्धांची कुटुंब संस्थेला मदतीचा खूप मोठी गरज असून सुद्धा वृद्धाश्रम निघत असल्याची खंत व्यक्त केली.गोविंद वृद्धाश्रमात दशरथ महाराज देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कडून वृद्धाश्रम चालवत असतानाचे अनुभव त्यांनी सांगितले.ताहेरा फाउंडेशन नी आयोजीत केलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी वृद्ध हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांची आदर झाला पाहिजे.असे मत व्यक्त केले.वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर भाऊक होऊन हाजी अबुबकर भाई तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोविंद वृद्धा आश्रमातील गरजूंना मदत करण्याचे ठरवले.पैगंबर दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर तांबोळी यांनी करताना ताहेरा फाउंडेशन ही सामाजिक संस्था गरजूंना नेहमीच मदत करणारी संस्था असून चांगला आणि समृद्ध समाज निर्माण व्हावा. यासाठी ताहेरा फाउंडेशन वचनबद्ध असल्याचे आपल्या प्रस्ताविकात सांगितले.
ताहेरा फाउंडेशनकडून मिळालेल्या किटमुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद ताहेरा फाउंडेशनचे सदस्य व पदाधिकाऱ्यांना आशिर्वाद देणारा दिसून येत होता.वृद्धाश्रमाला ताहेरा फाउंडेशन सारखी मदत इतर सामाजिक संस्थानी,दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहन या वेळेला दशरथ महाराज यांनी केले.

