पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पंढरपूर येथील एन. पी. कन्स्ट्रक्शन कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कार्यालयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यानंतर डॉ. रमेश फाटे यांच्या हस्ते खासदार मोहिते-पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एन. पी. कन्स्ट्रक्शन मार्गदर्शकचे नागेश फाटे उपस्थित होते.
भेटीदरम्यान खासदार मोहिते-पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, प्रलंबित विकासकामे, युवकांचे प्रश्न तसेच आगामी संघटनात्मक उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली. स्थानिक पातळीवर जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, युवक राज्य उपाध्यक्ष कृष्णराज बारबुले, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, शहराध्यक्ष दीपक वाडदेकर, बार्शी तालुकाध्यक्ष शिवशंकर धवन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

