सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी “ड्रीम नमो सोलापूर पर्यटन जागर संमेलन २०२६” आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट गार्डन, श्री गजानन महाराज मंदिराजवळ, सोरेगाव–कुमठे रोड, सोलापूर येथे होणार आहे.असे संयोजक श्री काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली,
ड्रीम सोलापूर पर्यटन विकास मंच, ड्रीम फाउंडेशन, चाणक्य गुरुकुल, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र व श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व कृषी पर्यटन स्थळांची माहिती, ब्रॅण्डिंग व प्रसिद्धी, तसेच कृषी पर्यटन, होम स्टे, अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी, सेंद्रिय भाजीपाला आणि सोलापुरी ज्वारीपासून तयार होणाऱ्या मिलेट उत्पादनांचे मार्केटिंग यावर संमेलनात विशेष भर देण्यात येणार आहे.
या संमेलनात शेतकरी, युवक, महिला, उद्योजक व पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना कृषी पर्यटन व होम स्टे व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे ब्रॅण्डिंग व प्रदर्शन करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवर सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने
विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मान होणार असून
सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये—
नमो युवा गौरव
नमो उद्योगरत्न
नमो समाजरत्न
नमो आदर्श कृषी पर्यटन केंद्र
नमो आदर्श युवा नेते
नमो आदर्श शिक्षकरत्न
या पुरस्कारांचा समावेश आहे.
महिलांसाठी ‘आई कृषी पर्यटन योजना’ याबाबत विशेष माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
सहभागींसाठी विशेष सुविधा
शालेय विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयीन युवक व सर्वांसाठी प्रवेश ठेवण्यात आले आहे. सहभागी सर्वांना चहा, अल्पोपहार, जेवण व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध पर्यटन केंद्रांची माहिती, हुरडा पार्टी व पर्यटन व्यवसायाच्या संधी, तसेच पर्यटन क्षेत्रातील प्रत्यक्ष व्यवसायाच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख : २६ सप्टेंबर २०२६
नाव नोंदणी व संपर्क
सतीश पाटील: ७२१९०९९९५५
ड्रीम फाउंडेशन कार्यालय, ओम गर्जना चौक, जुळे सोलापूर: ८२७५७२८३८८
समन्वयक – राहुल पाटील सर: ९८३४३०६३३७
मार्गदर्शक व मुख्य संयोजक – श्री. काशिनाथ भतगुणकी सर: ९८९०९४८३८८
सर्व शेतकरी, युवक, महिला, उद्योजक, पर्यटन व्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांनी या पर्यटन जागर संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


