भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
कांदिवली पश्चिम येथील गावठाण तलाव येथील यंग स्टार क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना दिसून आले.
त्यावेळी मंडळाचे सचिव नरेंद्र मुन्वाचार्य यांनी सांगितले की," १९७३ पासून मी या स्वयंसेवी मुलांना घेऊन विसर्जनाचे काम करतो, एक इंच पासून २१ फूटापर्यंतच्या गणेश मूर्ती चै विसर्जन या तलावात होते,ही मुले पाण्यात १४. १४ तास राहून विसर्जनाचे काम करत असतात, त्यांच्या साठी बनियन, चड्डी, चहा नाश्ता जेवण विभागातील विद्युत रोषणाई,व स्टेज या साठी साधारण दरवर्षी चार साडेचार लाख रुपये खर्च येतो, आमच्या मंडळास मनपा आर दक्षिण विभाग, पोलीस ठाणे,वा इतर कोणत्याही संस्था संघटना कडून आर्थिक मदत मिळत नाही, फक्त सहकार्य मिळते.कोरोना काळात गरिबांना धन धान्य वाटप केले, विसर्जन साठी आलेल्या मंडळा कडून आम्ही पैसे घेतो व पावती देतो,काही मंडळींनी यावर हरकत घेतली असता आम्ही समजावून सांगितले व त्यांचा गैरसमज दूर केला.
"यावेळी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांचा सत्कार केला व आभार मानले, या वेळी यंग स्टार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

