भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
स्वप्न फक्त पाहू नका, ते सत्यात उतरवण्याची जिद्द मनात ठेवा!भविष्यात केवळ नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने काम करून नका तर अनेकांना रोजगार देणारे उद्योजक आणि रोजगारदाते बनण्याचे स्वप्न पाहा. असे आ. अभिजित पाटील यांनी सांगितले.
भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रांगणात रयत शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माढा विधानसभाचे आ. अभिजित पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनरल बॉडी सदस्य डॉ. जे जी जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून मैनेजिंग कॉउनशील सदस्य शहाजी डोंगरे,मुख्याध्यापक संघ सातारा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, केंद्र प्रमुख सतीश शिंदे उपस्थित होते.
यावेळी आ. अभिजित पाटील म्हणाले की आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या प्रगतीसाठीही करा.संत तुकाराम महाराजांचा ज्ञानाचा विचार, कर्मवीर अण्णांचे ‘कमवा आणि शिका’ व स्वावलंबी शिक्षणाचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य आणि स्वामी विवेकानंदांचे विचार या प्रेरणेतून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःतील क्षमता ओळखून मोठे ध्येय निश्चित करावे.
आज घरी गेल्यानंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा “मला भविष्यात नेमकं काय बनायचं आहे?” त्या प्रश्नाचे उत्तर शोधा, ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या स्वप्नांना दिशा देताना आणि तुमच्या यशाच्या प्रवासात तुमचा मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे.
यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे, ई बा मुलाणी, वामन सराटे, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सरपंच रणजित जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,भीमराव जाधव,दिपक पवार, दिपक गवळी, धनंजय काळे, विठ्ठल चौगुले,राजू पाटील, नागेश पाटील,तानाजी पाटील, एस डी पवार,सुरेश शिंदे,सद्दाम सय्यद,शशिकांत विभुते,रविंद्र कारंडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिमरन शेख हिने मनोगत व्यक्त केले.तसेच रयत गीत, स्वागत गीत, वंदे मातरम विद्यार्थीनी गायले. मान्यवरच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक प्राचार्य के डी शिंदे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय रणजित दडस, अहवाल वाचन संजय शिंदे यांनी केले.तर सूत्रसंचालन माधवी भोसले यांनी केले तर आभार अशोक चव्हाण यांनी मानले.
भाळवणी व परिसरातील विद्यार्थ्या, पालक,सर्व शिक्षक, कर्मचारी व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



