पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
वैष्णवनगर (इसबावी) येथील नवयुग बहुउद्देशिय संस्था संचलित नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळाच्या नुतन पदाधिकार्यांची बैठक नुकतिच संपन्न झाली.
यावेळी मंडळाचे संस्थापक मेजर प्रशांत म्हेत्रे, मार्गदर्शक शशिकांत म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीमध्ये याबाबत चर्चा करून नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष संकेत गायकवाड, उपाध्यक्ष करण पंगुडवाले, सचिव सौरभ बहिरगुंड, खजिनदार ओंकार गायकवाड यांचा समावेश आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

