पुणे प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
महाराष्ट्रातील कोष्टी समाजासाठी आणि त्यांच्या पोटजातींच्या सामाजिक, आर्थिक, वैवाहिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उन्नतीसाठी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषद कार्यरत आहे.सर्व पदाधिकाऱ्यांना, समाज बांधवांना सोबत घेऊन परिषदेचे कार्य चालू आहे.त्याच अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेची त्रैवार्षिक बैठक रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जयश्री विद्यालय, आळंदी, पुणे रोड,देवकुळा पेट्रोल पंपा समोर,काळे काॅलनी, आळंदी देवाची,पुणे येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे.अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सतीश दाभाडे(नागपूर) हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.सदर त्रेवार्षिक बैठकी करिता अखिल भारतीय कोष्टी देवांग-देवांगन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ वरोडे यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
त्रैवार्षिक बैठकीमध्ये मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, मागील वर्षाचा ताळेबंद मंजूर करणे, नवीन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करणे, आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी,सदस्यांनी उपरोक्त बैठकी करिता आवर्जून उपस्थित रहावे.
सदर बैठक अतिशय महत्त्वाची असून कार्यकारिणीची निवड याच बैठकीत होणार असल्यामुळे कृपया राज्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाभाडे यांनी केले आहे.
सदर त्रैवार्षिक सभा यशस्वी करण्यासाठी आळंदी येथील समाज बांधव, पुणे व परिसरातील समाजबांधव, फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव नारायणराव वडे उमरखेड, परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव इदाते गंगाखेड, परिषदेचे खजिनदार विष्णू भाऊ कुटे परभणी, महिला प्रदेशाध्यक्षा सौ.मंदाताई गुलाबराव टकले निफाड, प्रदेश युवा अध्यक्ष विजय कलढोणे सोलापूर, परिषदेचे महासचिव रमेश भाऊ घटे परभणी, प्रोफेशनल ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव सपाटे नाशिक, परिषदेचे विदर्भ प्रमुख विलासराव गोरख, नरेंद्रजी माहुरे, विलास भड,सौ.मंगलाताई सुरेशराव झंझाड, किशोर भाऊ सरोदे, चंद्रशेखर नवरे, कैलास थोटे, मुंबई अध्यक्ष अरुणजी हांडे,अलोने बंधू, जिल्हाध्यक्ष प्रशांत उकंडे,रवी जुमळे, सुधीर अलोने,शरद देशकर,सौ.सुनंदाताई कोरडे, प्रशांत देशकर भंडारा, नरेंद्र शेंद्रे अमरावती,प्रा.संतोष दिवटे वाशिम, प्रसिद्धी प्रमुख नागेश गोरख यवतमाळ, मुंबई येथील प्रमुख पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ठाणे जिल्हाअध्यक्षा सौ.मंजुषाताई गोरख, सुरेश असलकर बीड, प्रसिद्धी प्रमुख प्रकाशजी पाखले धुळे, सोलापूर येथील परिषदेचे जेष्ठ पदाधिकारी भास्करराव चोथे, येवला येथील अध्यक्ष मनोज भागवत, युवा पदाधिकारी गणेश खेळकर, अकोला युवा अध्यक्ष सुर्यकांत होरे, संतोष डहाके, अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत धोपे,मंगरुळपीर येथील युवा कार्यकर्ते अविनाश झंझाड, यवतमाळ येथील ज्येष्ठ पदाधिकारी अरुणजी माहुरे, विदर्भ कोष्टी हितकारिणी मंडळाचे नागपूर गजाननराव थोपे, सचिव प्रदीप आगे, अमरावती येथील समाज बंधू वामनराव दाभाडे आणि राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी व राज्यस्तरावरील समाज बांधव सहकार्य लाभणार आहे.
तरी सर्वांनी या महत्त्वपूर्ण त्रैवार्षिक बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाभाडे यांनी केले आहे.

