माढा प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारत हिंदू महासभेच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे श्री विष्णू भाऊ बिचकुले यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (पत्रकार विभाग) पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र २६ सप्टेंबर २०२६ रोजी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे प्रदान करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंह यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय, राजा नरेंद्र नाथ, जगद्गुरू शंकराचार्य आणि महंत दिग्विजय नाथ जी यांसारख्या थोर राष्ट्रपुरुषांच्या आणि माजी अध्यक्षांच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. श्री विष्णू भाऊ बिचकुले यांच्या अविरत सामाजिक कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीप्रसंगी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ (महाराज), धर्म प्रचारक महंत योगी शिवनाथ जी महाराज (गुरु पीर जी योगी रिद्धिनाथ महाराज), राष्ट्रीय उपाध्यक्ष सद्गुरू योगी दादानाथ जी महाराज (गुरु सुखनाथ जी महाराज), राष्ट्रीय धर्म प्रसारक महंत योगी ऋषिकेश नाथ जी महाराज, महंत योगी नागनाथ जी महाराज, श्री महंत केशवानंद सरस्वती जी महाराज, श्री महंत योगानंद सरस्वती जी महाराज, महंत सच्चिदानंद सरस्वती जी महाराज, योगी प्रकाशनाथ जी महाराज, योगी शीतलनाथ जी महाराज, योगी सुंदरनाथ जी महाराज, मध्य प्रदेश प्रभारी योगी सिद्धनाथ जी महाराज, कर्नाटक प्रभारी नानू प्रकाश राठोड, पुणे जिल्हा अध्यक्ष धार्मिक प्रकोष्ठ श्री अर्जुन मेदनकर, महाराष्ट्र राज्य प्रभारी सौ. राणीताई पवार (परमार राजवंश ~ धार) तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ. आरतीताई राजपूत यांच्यासह इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (पत्रकार विभाग) श्री विष्णू भाऊ बिचकुले हे धर्मरक्षण, गौरक्षण आणि देशहिताचे कार्य अधिक सक्षमतेने पुढे नेतील असा विश्वास संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून व सर्वसामान्य जनतेकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


