भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम
गीतकार पत्रकार साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते जगदिश खेबुडकर साहित्य पुरस्कार २०२६ देण्यात येणार आहे असे दैनिक झुंजार केसरी चे मुख्य संपादक मुनीर खान यांनी भारत कवितके यांना निवड पत्राद्वारे कळविले आहे.सोमवार दिनांक ५ आक्टोंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वृंदावन मंगल कार्यालय, गाव देवी मैदानाच्या बाजूला,बेडकर रुग्णालया जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम या ठिकाणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री ठाणे एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते गीतकार भारत कवितके यांना गीत लेखनाच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार दैनिक झुंजार केसरी च्या वर्धापनदिना निमित्त देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
भारत कवितके यांनी अभंग, भावगीत, लावणी, विनोदी गीत, लोकगीत, अशी विविध प्रकारची गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात संजय केळकर आमदार ठाणे, निरंजन डावखरे आमदार,सुकृत खांडेकर संपादक दै,प्रहार, धनंजय सिंह , मुनीर खान संपादक दैनिक झुंजार केसरी,अगबर अली सय्यद संपादक दैनिक झुंजार केसरी, अंकुश कापकर कार्यकारी संपादक दैनिक झुंजार केसरी, प्रविण कदम सह संपादक, कृष्णा पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे, मनोज सानप, शिवराज बेंद्रे पोलीस अधिकारी, दिपाली परब उप संपादक, राजेंद्र गोसावी निवासी संपादक, शांताराम जाधव निवासी संपादक, शिवाजी बोबडे,नयुम शेख उप संपादक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत कवितके यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

