पंढरपूर प्रतिनिधी रामदास नागटिळक तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे एन. एस. एस डे निमित्त स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.महेश मठपती यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावातील अंतर्गत रस्ते व राजनंदिनी माध्यमिक विद्यालय परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थांनीही सहभाग घेतला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडिया यावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली.
यावेळी मोहन नागटिळक, संदीप पाटील, सागर गोडसे, रामदास नागटिळक, मुख्याध्यापिका सई शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अनिल नागटिळक, अरुण नागटिळक,बाळासाहेब धुमाळ, विठ्ठल पाटील, शिवाजी नागटिळक, समाधान चव्हाण, पांडुरंग नागटिळक, समाधान नागटिळक,दामोदर इंगोले युवान चे समन्वयक गोविंद लोखंडे, गायक कुलकर्णी, शुभम लोखंडे, अण्णा सलमपुरे आकाश भोसले,आर्यन नागटिळक यांच्या सह बहूसंख्या मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.बी बोचरे,पी. व्ही.शिखरे, पी. एस. तोंडे यांनी परिश्रम घेतले.

