झोन चेअरमन लायन अमिता कारंडे क्लबला यांची अधिकृत भेट
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
*लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीचे तर्फे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ आणि लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार, लायन्स आदर्श शाळा पुरस्कार २०२६*वितरण सोहळा रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रीन वुड रिसॉर्ट सोरेगाव, विजापूर रोड सोलापूर येथे उत्साह वातावरणात थांटात संपन्न झाला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.*एकूण ९ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ला. सातलिंग शटगार यांनी घंटानाद केले. ध्वजवंदन लायन मुकुंद जाधव यांनी केले. सर्व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आला.लायन सातलिंग शटगार अध्यक्ष यांनी स्वागत करुन मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिवांचा सेवा कार्याचा अहवाल लायन सोमशेखर भोगडे यांनी सादर केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख एम.जे.एफ लायन डॉ राहुल नारायणदास चंडक. कॅबिनेट ऑफिसर यांनी करून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे कार्यक्रमास विभागीय उपविभागीय सभापती लायन अमिता करांडे तसेच उपविभागीय यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झोन सचिवा लायन नाडकर्णी यांची उपस्थिती होती.
*शिक्षक हे भावी पिढीला घडवत आहेत. तसेच अभियंता हे वेगवेगळ्या क्षेत्रात समाज घटकांना आधार देऊन आकार देत आहेत.लायन अमिता कारंडे केले.गौरव उदगार असे*लायन्स आदर्श शिक्षक, आदर्श अभियंता, लायन्स आदर्श शाळेला अभिनंदन केले. लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटी वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीचे अध्यक्ष लायन सातलिंग शटगार, झोन चेअरमन लायन अमिता कारंडे सचिव लायन सोमशेखर, खजिनदार लायन नागेश बुगडे, झोन सचिव लायन लायन नाडकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तसेच लायन्स क्लबचे सर्व लायन लायन मुकुंद जाधव, एम.जे.एफ लायन डॉ राहुल चंडक कॅबिनेट ऑफिसर, लायन नंदिनी जाधव कॅबिनेट ऑफिसर, एम.जे.एफ लायन ममता बुगडे, लायन डॉ कृष्णा चंडक, इंजिनिअर लायन सागर पुकाळे, लायन ज्ञानेश्वर माने, लायन शुभांगी माने, प्रथम उपाध्यक्ष लायन संतोष जाधव, लायन निर्मला जाधव, लायन सुनिता शटगार, लायन संध्या कुनाळे, लायन गवळी, तसेच सोलापूरातील सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुरस्कारप्राप्त सौ वैशाली स्वामीराव शिंदे.(भारती विद्यापीठ बालविकास मंदिर सोलापूर),श्री शिवप्पा अप्पासाहेब बिराजदार. (एस व्हि एस हायस्कूल बोरामणी), सौ कला विठ्ठल चन्नापट्टण. (संभाजीराव शिंदे माध्यमिक, बिडी घरकुल सोलापूर), सौ नंदा दीपक चव्हाण. (छत्रपती शिवाजी बालक मंदिर सोलापूर),सौ विद्या सिद्राम हंचाटे. (संभाजीराव शिंदे प्राथमिक प्रशाला सोलापूर), श्री उमेश हणमंतु मल्लापुरे. (प्रयोगशाळा परिचर सिध्देश्वर कन्या प्रशाला सोलापूर),तसेच प्रा.डॉ.आर.व्ही दरेकर. (अभियंता स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,खेड, सोलापूर), श्री श्रीपाद महादेव पिपळेकर. (उप कार्यकारी अभियंता महावितरण, सोलापूर). आदर्श शिक्षक, लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार , लायन्स आदर्श शाळा सरस्वती प्राथमिक शाळा अरणगांव रोड बार्शी, जिल्हा सोलापूर,पुरस्कार स्वरुप स्मृती चिन्ह, शाल, मोत्यांचे माळ, प्रमाणपत्र, बुके देऊन सन्मानित करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शिक्षक, अभियंता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लायन सातलिंग शटगार यांनी प्रमुख पाहुण्यांचा भेट वस्तू आणि स्मृतिचिन्ह, शाल, मोत्यांचे माळ, बुके देऊन सत्कार केले. शेवटी आभार प्रदर्शन सचिव लायन सोमशेखर भोगडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.जे.एफ लायन ममता बुगडे, कॅबिनेट ऑफिसर लायन नंदिनी जाधव यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनानी झाली.

