जोगेश्वरी वार्ताहर गणेश हिरवे तेज न्यूज
सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पायरी वर श्री व सौ पुजा योगेश मुळे यांच्या शुभ हस्ते महाअभिषेक करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मिनिस्टर श्री मंगलप्रभात लोढा जी स्वतःहून उपस्थित राहून महाआरती लाभ घेतला व त्यांच्या सत्कार ट्रस्ट बोर्ड आणि नामदेव शिंपी समाज बांधव भगिनी यांच्या तर्फे करण्यात आला.
सत्कार प्रसंगी दोन शब्द बोलताना कॅबिनेट मिनिस्टर श्री मंगलप्रभात लोढा जी यांनी मंदिराच्या सुशोभीकरण करण्यासाठी मंदिराला आमदार निधी मधून रुपये ५ लाख मंजूर करून सर्व प्रथम मंदिराला नवीन लाद्या बसवण्यात आल्या व इतर सुशोभीकरण सहजीवन सोहळा झाल्यानंतर करण्यात येईल असे सर्व उपस्थित समाज बांधव व भगिनी यांना सांगण्यात आले.
तसेच संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री केशव रमेश मुळे यांनी ६ वी खेतवाडी येते जो चौक आहे तिथे येथे नामदेव महाराज चौक याचे नामकरण करावे अशी सूचना वजा नम्र विनंती सर्व भारतीय शिंपी समाजातर्फे आमदार साहेब यांना करण्यात आली व तत्वतः मान्यता देण्यात आली.
तसेच विभाग क्रमांक २१७ चे नगरसेवक गौरांग झवेरी आणि विभाग क्रमांक २१९ चे नगरसेवक सनी सानप हे दोन नगरसेवक आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा सत्कार उपरोक्त समजा तर्फे करण्यात आला.
यानंतर १० वी १२ वी आणि पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संस्थेतर्फे करण्यात आला आणि श्री गौरीहार कृष्णा उनकुले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समजा तर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेला नूतन व तरुण प्रमुख विश्वस्त लाभल्याने पोटे पवार आणि बकरे व सर्व समाज बांधव भगिनी यांच्या तर्फे करण्यात आला. यानंतर सर्व समाज बांधव भगिनी यांनी पारंपारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि चवदार महाप्रसादाचा लाभ घेतला.
सर्व विश्वस्त मंडळ यांना कार्यक्रम मंगलमय आनंदीमय वातावरणात साजरा करण्यासंबंधी सर्व समाज बांधव व भगिनी यांनी शुभेच्छा देण्यात आल्या.

