सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D-1 च्या 2026-27 वर्षाकरिता विभाग-1 मधील उपविभाग -2 च्या सभापतीपदी अभ्यासू व्यक्तिमत्वाचे, नवोपक्रमशील, लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांची निवड प्रांतपाल लायन राजेंद्र शहा-कांसवा यांच्याकडून करण्यात आली आहे .
उपविभाग-2 मध्ये लायन्स क्लब अक्कलकोट, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल,लायन्स क्लब सोलापूर रॉयल,लायन्स क्लब सोलापूर सिटी.असे एकूण चार क्लबची जबाबदारी लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांना देण्यात आली आहे .
उपविभागीय सभापतीपदी निवड झाल्यानंतर लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की सेवेतून संतुष्टी हे ब्रीद समोर ठेवून रंजन उपक्रमाद्वारे जिथे मानवतेचा स्पर्श तिथेच खऱ्या सेवेला अध्यात्माची दिशा मिळते हा उदात्त्य हेतू समोर ठेवून माझ्या भागातील चारही लायन्स क्लब कडून, वर्षभराचं सुयोग्य नियोजन करून विविध क्षेत्रात सेवा हीच सर्वोच्च साधना म्हणून मी कार्य करणार आहे.
लायन कलशेट्टी पुढे म्हणाले की, माझ्या चारही लायन्स क्लब मधील सदस्य समाजाच्या विविध क्षेत्रातील सेवाकार्यात तन- मन- धनाने कार्यरत राहणार आहे.अशी माहिती उपविभाग-2 सभापती लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी तेज न्यूज ला दिली .


