पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दुमाला येथील आदर्श उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून सर्व परिचित असलेल्या शिक्षिका वैशाली अभिमन्यू वाघमारे व महानंदा सुधाकर सावंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील पहिली ते सातवी या वर्गासाठी अतिशय दर्जेदार व नियमित वापर होणारे शाळेसाठी गरजेचे असणारे सात चप्पलचे स्टॅन्ड शाळेस भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास करण्यासाठी उत्तम दर्जाच्या नवनीतच्या 200 पानी वह्याचे व खाऊचे ही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शरद कोळी यांनी शाळेतील दोन्ही शिक्षकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन शाळेची गरज ओळखून त्यांनी दिलेले चप्पलचे स्टॅन्ड व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी पडणाऱ्या दिलेल्या वह्या तसेच खाऊचे वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून आपण केलेली मदत शाळा व विद्यार्थी दीर्घकाळ स्मरणात ठेवतील असे मनोगत व्यक्त केले.
शाळेतील उपशिक्षक सुनील कोरे यांनी शिक्षिका महानंदा सावंत व वैशाली वाघमारे यांना यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून आपण आपला वाढदिवस नेहमीच गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी गरज असणाऱ्या वस्तू देऊन साजरा करता व शाळेस आणि विद्यार्थ्यास आनंद देता याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून सावंत व वाघमारे यांना उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
पदवीधर शिक्षक शामराव जाधव व शिक्षिका जयश्री राऊत यांनी सावंत व वाघमारे यांनी दोघींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दोघी शिक्षिकाचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा केला.

