राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या हस्ते
श्रुती होमकरला सुवर्णपदक पुरस्कार प्रदान.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.एस.सी. अभ्यासक्रमात घवघवीत यश मिळवणाऱ्या श्रुती रमेश होमकर यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
याबद्दल श्रुती होमकरचा श्री.वटवृक्ष मंदीरात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते
श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
कु.श्रुती हिने बी.डी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर मधून बी.एस.सी.पूर्ण केले. तिने संपूर्ण बी.एस.सी.अभ्यासक्रमात ९५.०६% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर केमिस्ट्री विषयातही विद्यापीठात प्रथम येऊन तिने सुवर्णपदक पटकावले. हा सुवर्णपदक वितरण सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना चेअरमन
महेश इंगळे म्हणाले की कु.श्रुती होमकर
हिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो. तिचे वडील रमेश होमकर हे मंदीरात सेवेकरी आहेत.
९५.०६% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येणे ही सोपी गोष्ट नाही. केमिस्ट्री सारख्या कठीण विषयात सुवर्णपदक पटकावणे हे तिच्या मेहनतीचे फळ आहे. मुलींनी शिक्षणात अशी आघाडी घेतली की समाजाला प्रेरणा मिळते. या कामी तिला कॉलेज आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन याला कारणीभूत आहे. राज्यपालांच्या हस्ते सन्मान मिळणे हे मोठे भाग्य आहे.
श्रुतीने पुढे संशोधन करून देशाचे नाव उज्वल करावे हीच सदिच्छा असून अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळेच सोलापूरचे नाव राज्यात उंचावले आहे. या यशाबद्दल तिचे वडील रमेश होमकर आई प्रभावती होमकर तसेच कुटुंबीय वनमाला प्रभाकर होमकर, सधनम अक्षय बाचल, स्नेहा अक्षय बाचल यांनीही आनंद व्यक्त केला आहे. यावेळी श्रुती म्हणाली की महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले आहे. पुढेही संशोधनाच्या क्षेत्रात काम करून देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि त्या प्रयत्नांना श्री स्वामी समर्थांचे, मंदीर समितीचे व महेश मालक इंगळे यांचे आशिर्वाद प्रेरणादायी आहेत असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, राजेश गोडे, श्रीपाद सरदेशमुख, सागर दळवी, श्रीशैल गवंडी, आदींसह भाविक भक्त व होमकर कुटूंबीय उपस्थित होते.

