![]() |
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (जीवन पंढरी) कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मुख्य प्रबंधक अरुण मिरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सांगोला शाखाधिकारी ज्ञानेश्वर खंदारे, शाखाधिकारी एजन्सी अश्विनी बिराजदार, विकास अधिकारी जगताप, पांडे, जितेंद्र अंतूरकर, बी. एस. चौगुले यांच्यासह विमा प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य प्रबंधक अरुण मिरगे म्हणाले की, प्रत्येक विमा प्रतिनिधीने नियमितपणे काम केले पाहिजे. दररोज ग्राहकांच्या भेटी घेऊन त्यांच्या गरजा समजून घेत विमा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितच उज्ज्वल यश मिळू शकते. त्यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अश्विनी बिराजदार यांनी आभार मानले. यावेळी विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

