पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी दिनांक १६ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे.
त्यामुळे आज पासून प्रक्षाळपुजा पर्यंत श्रींचे दुपारच्या पोशाखाचे फोटो येणार नाहीत ह्याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.

