पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्रीय संघटन महामंत्री मा मिलिंदजी परांडे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पू.धर्माचार्यांची भेट मध्ये ह.भ.प श्री राणा महाराज वासकर, ह.भ.प. श्री चैतन्य महाराज व ह.भ.प. श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर,ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर, तसेच ह.भ.प श्री वासाडे महाराज यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
तसेच सोबत क्षेत्र संघटन मंत्री श्री अण्णा पंडित, प्रांतमंत्री श्री किशोरजी चव्हाण, क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख श्री संजय मुरदाळे, प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख श्री राठी महाराज प्रांत धर्माचार्य सहप्रमुख नागनाथ बोंगरगे ,प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख संजय कुलकर्णी , प्रांतनिधी प्रमुख श्री धनाजी मामा शिंदे, विभाग सहमंत्री श्री संजय जमादार, जिल्हासहमंत्री श्री गोपाळ सुरवसे, श्री प्रवीणजी कुलकर्णी, सेवाविभाग जिल्हा प्रमुख श्री संभाजीराव मडके आदि विहिंप कार्यकर्ते उपस्थित होते.

