पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन 2026-27 आषाढी वारी स्वच्छता सेवा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले.
सदरील स्वच्छता सेवा प्रकल्पासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त कादर शेख, शिक्षणाधिकारी माध्य. तथा जिल्हा आयुक्त स्काऊट सचिन जगताप , उपशिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा आयुक्त गाईडo रूपाली भावसार , उपशिक्षणाधिकारी माध्य. तथा जिल्हा चिटणीस विठ्ठल ढेपे , लेखाधिकारी समग्र शिक्षा अभियान तथा जिल्हा कोषाध्यक्ष राहुल सलगर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट शंकर यादव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सुलक्षणा लोखंडे , जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे व जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाठ व रशीद पठाण जिल्हा आयुक्त रोहर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28/7/2026 रोजी उत्साहात पार पडला. सदर स्वच्छता अभियानास नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे व पंढरपूर गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांनी स्वछता रॅलीचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
यावेळी श्रीमल्लकार्जुन हायस्कूल सोलापूर , श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर , माध्यमिक प्रशाला वडवळ, जि.प. प्रा. शाळा बारडी, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ, विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर , श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पंढरपूर, श्री स्वामी समर्थ प्रशाला आरळी , रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ,न्यू इंग्लिश स्कूल करकंब,श्री दुर्गा शिशु विहार प्राथमिक शाळा इसबावी, कर्मवीर विद्यालय चारे, श्री गगनगिरी विद्यालय सांगवी , दत्त विद्या मंदिर सुस्ते ,लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव व सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला इ. शाळेतील 852 स्काऊट व गाईड व 92 शिक्षक शिक्षिका यांनी सहभाग घेतला होता.
हे स्वछता अभियान यशस्वी करण्यासाठी महादेव पुजारी , यंपे सर, समाधान बेद्रे, महेश भोसले, बाळासाहेब शिंगाडे, अशपाक मुजावर यांनी स्वच्छता सेवा प्रकल्पास परिश्रम घेतले.

