पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आणि निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय वितरणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने, मीडिया शिपर्स यांच्या सहकार्याने ‘आता थेट जगाचं मार्केट!’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFAI), लॉ कॉलेज रोड, पुणे येथे होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे. मात्र, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत Global Distribution, Content Licensing, OTT Platforms, Broadcast Rights, Theatrical Rights आणि International Sales या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठेत प्रभावीपणे कसे पोहोचवता येईल, याविषयी तज्ज्ञ प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय चित्रपटांची नोंदणी प्रक्रिया, Metadata Management, आंतरराष्ट्रीय ग्राहक व वितरकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धती, तसेच विविध डिजिटल आणि जागतिक प्लॅटफॉर्मवर चित्रपट सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली जाणार आहे.
भारतीय चित्रपट, मालिका आणि इतर ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंटला जागतिक स्तरावर प्रेक्षक आणि वितरकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या मीडिया शिपर्स संस्थेचे तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागींसोबत आपला अनुभव आणि ज्ञान शेअर करणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक तसेच चित्रपट क्षेत्रातील इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
जुई सोनटक्के – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
मो. ८९२८७९९५२७

