पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे साहेब यांना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी निवेदन देत तक्रार केली आहे.
या निवेदनात लिहिले आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळ धनगर आरक्षण चळवळ ओबीसी आरक्षण बचाव चळवळीत काम करीत आहे यावेळी समाज हिताच्या वेगवेगळ्या भूमिका सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमधून मांडत असतो मागच्या महिन्यामध्ये पंढरपुर येथे रोहित पवार यांनी आंदोलन केले होते. यावेळी सुद्धा मी रोहित पवार यांना शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्यात हक्क नाही कारण यांच्या कुटुंबांनीच शेतकऱ्यांची लूट केलेली आहे रोहित पवारांचं हे आंदोलन फसव आहे म्हणून आंदोलन स्थळी गोमूत्र शिंपडून ते स्थान शुद्ध केले होते यावरून प्रचंड चिडून जाऊन रोहित पवार व त्यांचे कार्यकर्त्यांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला व अनेक गुंडांकरवी माझ्यावरती पाळत ठेवून हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे मला शंका येत असून रोहित पवारांच्या सांगण्यावरून काही गुंड माझ्या पाठीवर असल्याचे हे व माझ्या बद्दल चौकशी करत असल्याचे हे दिसून येते तसेच वैयक्तिक मला फोन करून माझ्या सोशल हँडलवर जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या अगोदरही मी आंदोलन करत असल्यामुळे माझ्यावरती विविध केसेस दाखल आहेत रोहित पवार हे अत्यंत खुनशी प्रवृत्ती चे असुन त्यांनी अस्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे ,महाविकास आघाडीचे सरकार असताना सातत्याने सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना फोन करून माऊली हळणवर यांना तडीपार करा अशा सूचना देत होते आणि आताही तसा प्रकार करण्याची शक्यता आहे काही बगलबच्चे माझ्यावरती खोट्या केसेस दाखल करून मला अडकवण्याची शक्यता आहे. असे माऊली हळणवर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हळनवर म्हणाले,मी अनेक वेळा पोलीसात तक्रार दाखल केली आहे. अर्ज दिले आहेत. परंतु कुठलीही योग्य कारवाई होत नाही त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष घालून सोलापूर पोलिसांना सूचना द्याव्यात.
असे निवेदन दिले यावेळी सोबत ओबीसी नेते हरीभाऊ गावंधरे दिपक गवळी उपस्थित होते यावेळी सभापती प्रा राम शिंदे यांनी तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पोलिस प्रमुखांना योग्यती कारवाई कारवाई करत संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या.


