पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमली पदार्थाची व अवैध दारु विक्री करणा-या आरोपींचा शोध घेवुन त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे पोनि / संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीकारी व पथकला कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. दि. 16/07/2026 रोजी सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हवालदार/ विजयकुमार भरले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नामे भैरवनाथ भोसले रा. अंकोली ता. मोहोळ याने त्याचे शेतातील जनावरचे गोठ्यात अवैध गांजा साठा ठेवला आहे.
सदरची माहिती संजय जगताप , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली. पोनि/ जगताप यांनी सदरची माहिती मोहोळ पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक दिपक पाटील व त्यांचे स्टाफसह जाऊन पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे सपोनि पाटील यांनी दिपक पाटील पोलीस निरीक्षक यांना प्राप्त गोपनिय बातमी दिली. तदनंतर पोनि / दिपक पाटील यांनी प्राप्त गोपनिय बातमी प्रमाणे इसम नामे भैरवनाथ भोसले रा. अंकोली ता. मोहोळ याच्या शेतातील जनावर गोठ्यात छापाकारवाई केली असता, सदर गोठ्यामध्ये 2 प्लास्टीकचे पोते भरलेल्या आवस्थेत मिळुन आले. सदर प्लॉस्टीक पोते बाबत इसम नामे भैरवनाथ भोसले याचेकडे विचारपुस करता तो उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागला. सदरचे प्लास्टीक पोते तपासले असता त्यामध्ये उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया, बोंड आलेला मादक पदार्थ असलेला असा एकुण 20,19,250/- रुपये किमतीचा 40 किलो 385 ग्रॅम वजनाचा मादक पदार्थ गांजा मिळुन आला. सदरचा गांजा पोलीसांनी जप्त केला.
सदर इसम नामे नामे- भैरवनाथ भोसले रा. अंकोली ता. मोहोळ याचे विरुध्द गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय १९८५ चे कलम 8 (c), 22(b), (ii), (c) अन्वये मोहोळ पोलीस ठाणे गु. र. नं :-699/26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधीकारी सोलापूर, सुरज जगताप, पोलीस निरीक्षक, संजय जगताप स्था.गु. शाखा, पोलीस निरीक्षक / दिपक पाटील नेम. मोहोळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / भिमगोंडा पाटील, पोलीस हवालदार / सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, मपोहेकों / आश्वीनी गोटे, पोकों / सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, चापोकों/दिलीप थोरात तसेच मोहोळ पोलीस ठाणे कडील सपोनि / नितीन अतकरे, पोउपनि / नवनाथ पाटील व पोलीस स्टाफ यांनी बाजवली आहे.

