पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील आषाढी वारी निमित्ताने श्री विश्वधारा आयुर्वेदिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत उपचार शिबिराचे आयोजन डॉ.श्रद्धा कदम यांच्या वतीने करण्यात आले होते.या मोफत आरोग्य शिबिरामध्ये 3000 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले.
श्री विश्वधारा आयुर्वेद प्रतिष्ठान यांच्या वतीने सलग ४ वर्षांपासून आषाढी वारीमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात येत आहे.
श्री विश्वधारा आयुर्वेद प्रतिष्ठानच्या आषाढी वारीतील मोफत आरोग्य शिबिरामध्ये डॉ.श्रीधर यलमार,डॉ.श्रीकांत खटावकर,डॉ.कैलास नरळे,डॉ.किरण थोरात,डॉ.स्वप्नील बारी, निलेश जगताप,दिपाली सतपाल,सारिका आरफा खाटीक व पूजा मॅडम यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी रेखा चंद्रराव यांनी सहकार्य केले.
आषाढी वारी मध्ये यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले होते. त्याचप्रमाणे पावसाचा देखील परिणाम झाल्यामुळे वारकऱ्यांना थंडी,ताप,अंगदुखी,डोकेदुखी, मळमळणे अशा प्रकारचे आजार झालेले होते.या सर्व वारकरी रुग्णांवर श्री विश्वधाराच्या वतीने मोफत उपचार करण्यात आले.
श्री विश्वधारा आरोग्य प्रतिष्ठानच्या या शिबिरास पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी भेट दिली.

