पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकऱ्यांच्या सरसकट २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत शासनाने तात्काळ सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. "शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अन्नदात्याला दिलासा मिळणे ही काळाची गरज आहे," असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल, जिल्हा उपाध्यक्ष किरण कचरे, जिल्हा सचिव स्वप्निल गायकवाड, पंढरपूर विभागाचे तालुकाध्यक्ष शेखर आटकळे, करकंब विभागाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष सत्यम धुमाळ तसेच जगदीश पवार, अल्ताफ मुंडे आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने, "जिथे विषय गंभीर, तिथे संभाजी ब्रिगेड खंबीर," अशी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली.


