अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
यशवंत संघर्ष सेना विद्यार्थी आघाडीच्या युवती प्रदेश अध्यक्ष पदी निवड झालेल्या कु. श्वेताताई गणेश शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वगुणांमुळे, संघटन कौशल्यामुळे आणि समाजहिताच्या कार्यातील समर्पणामुळे आपण या महत्त्वाच्या पदावर विराजमान झालात, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
आपल्या कार्यातून विद्यार्थिनी, युवती व समाजातील सर्व घटकांना नवी दिशा, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. आपण संघटनेचे विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचवून समाजकारण व राष्ट्रकारणात उल्लेखनीय योगदान द्याल, हीच अपेक्षा.
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस, उज्ज्वल भविष्यास आणि संघटनात्मक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


