भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखना सहयोगी ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि, चंद्रभागानगर, भाळवणी कारखान्यातील सेवेतुन निवृत्त् झालेल्या 18 अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी मागील 20 ते 38 वर्षापासून प्रामाणिकपणे सेवाकरुन सेवा निवृत्त् झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे एक कटुंब प्रमुख म्हणुन आम्हा सर्व संचालक मंडळाची जबाबदारी असल्याचे सांगुन, ही संस्था उभारण्यामध्ये आणि नावारुपास आणण्यास या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. जरी हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरीही यापुढे त्यांना कोणतीही अडचण आल्यास मी सदैव त्यांचे पाठीशी उभा राहणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त् प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांनी माझे सेवाकालावधीत चेअरमन कल्याणराव काळे , व्हा.चेअरमन भारत कोळेकर सर्व संचालक मंडळ यांचे बहुमोल सहकार्य लाभल्यामुळे मी सदैव त्यांचा ऋणी असून, सेवाकालावधीत सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
तसेच इंजिनिअरींग विभागाकडील सेवानिवृत्त् कर्मचारी गौतम गुंड यांनी आपल्या मनोगतात चेअरमन काळे यांनी आमचा सत्कार करुन, आम्ही आजअखेर प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती दिल्याचे सांगुन सेवाकालावधीत कै.दादांच्या आर्शिवादाने आणि चेअरमन काळे यांच्या कृपेने माझे तीन्ही मुलांचे शिक्षण कारखान्याचे शाळेमध्ये विनामुल्य झाले असून, आज माझी मुले उच्च शिक्षण घेवुन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. कै.दादांची शिकवण आणि आचार विचारामुळे मी निर्वसनी राहुन माझे मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देवु शकलो, दोन एकर जमीन व ट्रॅक्टर घेवुन शकलो, त्यामुळे आज मी व माझे कुटुंब सुखी समाधानी आहे, हे सर्व सहकार शिरोमणी कारखान्यामुळे करु शकलो. आपल्या सेवाकालावधीतील आठवणींना उजाळा देवुन सेवाकालावधीत सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभारी माणुन सेवानिवृत्तीनंतर आम्हास मिळणारी पेन्शन चालु करणेची विनंती चेअरमन काळे यांना केली.
तसेच सेवानिवृत्त् कर्मचारी शिवमुर्ती पवार यांनी सहकार शिरामणी कारखान्यामुळे आज माझ्या मुलास पीएसआय करु शकलो, माझे 25 वर्षाचे कालावधीत चेअरमन काळे यांचे मार्गदर्शन आणि अडचणीच्या काळातही वेळोवेळी केलेली आर्थिक मदत यामुळे मी मुलांना चांगले शिक्षण देवुन पीएसआय करु शकल्याचे मनोगतात व्यक्त् करुन, सहकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी व संचालक मंडळाचे सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी कारखान्याचे सेवानिवृत्त् प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, चिफ अकौंटंट बबन सोनावले, मुख्य शेती अधिकारी प्रतापराव थोरात, तसेच विविध विभागाकडील सेवानिवृत्त् आबासो मासाळ, विलास लिंगे, चंद्रकांत बोधे, ज्ञानेश्वर कौलगे, नेताजी डुबल, मधुकर गायकवाड, विष्णु खवणकर, भारत पोरे, तुकाराम हाके, बाळासाहेब ताटे, प्रकाश शिंगटे, शामराव गोडसे, श्रीधर रणवरे, हणुमंत काळे यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त् कर्मचाऱ्यांना विशेष सहकार्य सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष बंडु पवार आणि सेक्रेटरी दशरथ लामकाने यांनी केले.
सदर कार्यक्रमास सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


