पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया २७ जून ते ३ जुलै या कालावधीत बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडणार आहे.
ही भरती प्रक्रिया कर्नाटक,महाराष्ट्र,,गोवा मध्य प्रदेश,छत्तीसगड,गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील उमेदवारांसाठी खुली आहे.भरतीचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.२७ जून: खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी.
२८ जून (महाराष्ट्र)अहमदनगर,अकोला अमरावती,छत्रपती संभाजीनगर,बीड, बुलढाणा,भंडारा,चंद्रपूर,धुळे,गडचिरोली गोंदिया,हिंगोली,जळगाव,जालना,कोल्हापूर,लातूर,मुंबई या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदाची भरती.
२९ जून (महाराष्ट्र) नागपूर, नांदेड नंदूरबार,नाशिक,धाराशिव,पालघर परभणी,पुणे,रायगड,रत्नागिरी,
सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,सोलापूर ठाणे,वर्धा,वाशीम,यवतमाळ या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदाची भरती.
१ जुलै मध्य प्रदेश,छत्तीसगड,गुजरात, गोवा,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील उमेदवारांसाठी भरती.
२ जुलै ट्रेड्समन पदासाठी भरती.
३ जुलै ऑफिस असिस्टंट (क्लर्क) आणि स्टोअरकीपर टेक्निकल पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी राखीव.
सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित वेळेत भरती केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्री प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


