सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगोला तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती शिवसेना सांगोला विधानसभा समनव्यक शंकर मेटकरी यांनी तेज न्यूज ला दिली.
शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात ज्या शिवसैनिकांनी संघर्ष करुन शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या आणि त्या शाखांच्या माध्यमातून शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करुन वेळ प्रसंगी स्वतःचे रक्त सांडले. तेच शिवसैनिक आज उतार वयात आहेत म्हणून त्यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे आणि हीच बाब माझ्या लक्षात आली आणि मला त्यांचा सन्मान करण्याची कल्पना सुचली. दुसरी गोष्ट म्हणजे या जेष्ठ शिवसैनिकांकडे एक मोठा अनुभव आहे. आजच्या संघर्षाच्या काळात या जेष्ठ शिवसैनिकांच मार्गदर्शन खूप मोलाच आहे.
या जेष्ठ शिवसैनिकांना मी सहकाऱ्यां सोबत प्रत्यक्ष भेटून एक आकर्षक ट्रॉफी आणि कृतज्ञता पत्र देऊन त्यांच्या शिवसेनेतील कार्याचा गौरव केला.


