मा.मंत्री बाळाभाऊ बेगडे यांचा चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थांनी सामान्य माणसाच्या भाषेत आध्यात्माचं दर्शन घडविलं आणि अडलेल्या, दुःखी माणसांना आधार दिला आहे. स्वामींचे नामस्मरण व श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपणं याने मन शांत होतं आणि श्रद्धा वाढते. या माध्यमातून निर्माण झालेली स्वामी समर्थ महाराजांची भक्ती म्हणजे निस्वार्थ सेवा, श्रद्धा आणि समर्पण याचा मार्ग असल्याचे मनोगत पुणे जिल्ह्यातील मावळचे रहिवासी व राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी व्यक्त केले.
नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले.
यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या वेळी माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री बेगडे यांनी भक्त अक्कलकोटला येवून स्वामींचे दर्शन घेतात. स्वामींचं चरित्र वाचतात. स्वामी चरित्र पोथी पारायण करतात. स्वामींची भक्ती फक्त मंदिरात मर्यादित नाही. प्रामाणिकपणे काम करणं, मिळालेल्या परिस्थितीत समाधान मानणं हीच खरी उपासना आहे असं त्यांचं सांगणं होतं.
स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवून स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं आणि इतरांना जमेल तशी मदत करणं अशी वागणूक श्री स्वामी समर्थांना प्रिय असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक नन्नू कोरबू,
नगरसेवक नावेद डांगे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.


