अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
मा. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, शंकरनगर येथे मा. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते मा. शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भगवान धन्वंतरींच्या पूजनाने या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी हॉस्पिटलच्या वतीने डीन डॉ. प्रशांत निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. शिबिरात एकूण ६३५ लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला, ज्यामध्ये २३५ जणांनी रक्तदान केले, १५६ जणांचे जनरल चेकअप, ६१ ईसीजी, ६० नेत्र तपासणी, ५८ अस्थिरोग तपासणी, २२ एक्स-रे आणि १५ सोनोग्राफी तपासण्या करण्यात आल्या. या सोहळ्यात डॉ. एम. के. इनामदार यांनी उपस्थितांना वैद्यकीय मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्षा सौ. रेशमाताई अडगळे, मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे MD श्री. स्वरूप देशमुख, डॉ. अमोल शिंदे, जनरल फिजिशियन डॉ. समीर दोशी, डॉ. बाहुबली दोशी (डायरेक्टर, दोशी पॅथॉलॉजी), निमा (NIMA) अध्यक्ष डॉ. अमोल माने आणि होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित राजे भोसले यांचा प्रामुख्याने समावेश होता.
तसेच संस्थेचे ट्रस्टी संजय राकले,सहसचिव शिवदास शिंदे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रशासकीय अधिकारी विक्रमसिंह बागल यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खताळ यांनी केले. उपस्थितांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.


