सेलू प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रभक्ती परिवार आणि शौर्य अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक म्हणून " राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्काराने " अमित प्रभाकरराव चिनेवार यांना सन्मानित करण्यात आले.
अमित प्रभाकरराव चिनेवार यांनी श्रीमती सविता राणी नारायणदास जावंधिया महाविद्यालय ,देवळी येथून आपल्या कार्याला सुरुवात केली.पुढे यशवंत महाविद्यालय , सेलू येथे उपप्राचार्य पदावर त्याची संस्थातर्गत बदली झाली.२२ वर्षाच्या अध्यापन काळात त्यांनी केवळ विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले नाही तर त्यासोबतच अनेक सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक,धार्मिक कार्यातही हिरीरीने सहभाग घेतला.त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरभाऊ देशमुख,उपाध्यक्ष सतीशराव राऊत,गुरुजन, पत्नी-मुले- कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यरत व सेवानिवृत्त सहकारी वृंद यांना दिले.

